आजचे राशीभविष्य, सोमवार 25 जुलै 2022

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 25 जुलै 2022 | मेष :- सकारात्मकतेची जोड घ्याल. प्रेरणा देणार्‍या घटना घडतील. कार्यालयीन सहकारी मदत करतील.

वृषभ:- चिकाटी सोडून चालणार नाही. नवीन योजना मनात रुंजी घालतील. दिवसभर उत्साह जाणवेल. गैरसमजाला मनात थारा देऊ नका.

मिथुन:- हलक्या कानाच्या लोकांपासून दूर राहावे. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. घरगुती खर्चाचे गणित मांडावे लागेल.

कर्क:- हाती मिळालेला वेळ सत्कारणी लावावा. व्यायामाला कंटाळा करू नका. कामाचा आवाका समजून घ्यावा. आपले गुपित उघडे करू नका.

सिंह:- वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी पार पाडाल.

कन्या:- कामातील रुचि वाढवावी लागेल. नातेवाईकांना नाराज करू नका. आवडते छंद जोपासाल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा लागेल.

तूळ:- मानसिक ताण नियंत्रणात ठेवा. ध्यानधारणा करावी. हिशोबात चोख रहा. वर्तन चांगले ठेवा.

वृश्चिक:- व्यवसायातील अनुभवी लोकांचा सल्ला घ्याल. मुलांचे वागणे स्वतंत्र वाटेल. आपल्या मनातील कल्पना आमलात आणाव्यात. जवळचा प्रवास घडेल.

धनू:- कायदेशीर बाबी पाळाव्या लागतील. कामाची धांदल राहील. मानसिक शांतता जपावी. मेहनतीचे फळ मिळेल.

मकर:- आरोग्याची वेळेवर काळजी घ्या. कामे वेळेत हातावेगळी होतील. कामातून समाधान शोधाल.

कुंभ:- प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. दिवस मनाप्रमाणे घालवाल. नवीन ओळखीचा फायदा होईल.

मीन:- व्यावसायिक गुंतवणूक जपून करावी. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. दिवस संमिश्र जाईल. तिखट पदार्थांचा आस्वाद घ्याल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम