
बातमीदार | १२ ऑगस्ट २०२३ | प्रत्येक घरातील स्वयंपाक गृहात चहा तसेच गोड पदार्थांची चव आणि वास वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, ही छोटी दिसणारी वेलची तुमचं निद्रीत भाग्य चमकवण्याचं काम करू शकते. ज्योतिषशास्त्रात वेलचीचे काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. ज्याद्वारे व्यक्तीला त्याच्या कार्यक्षेत्रात अधिक यश मिळवता येते. याशिवाय जीवनातील अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवून आर्थिक लाभही मिळू शकतो. याविषयी ज्योतिषी आणि पंडित हितेंद्रकुमार शर्मा छोट्या वेलचीशी संबंधित काही खास उपाय सांगत आहेत.पैशाची चणचण थांबेल -बरेच लोक खूप कष्ट करून पैसे कमावतात, पण हा पैसा त्यांच्याकडे फार काळ टिकत नाही.
तुमचीदेखील हीच परिस्थिती असेल तर वेलचीचा उपाय तुमची समस्या कमी करू शकतो. यासाठी 5 लहान वेलची घ्या आणि पर्स किंवा पाकीटामध्ये ठेवा. असे केल्याने उत्पन्नात भर पडेल, तसेच फालतू खर्चही थांबतील.कामात यश मिळवण्यासाठी -जर तुमची काही कामे कित्येक दिवसांपासून रखडली असतील किंवा काही कारणास्तव पूर्ण होत नसतील तर कामाच्या यशासाठी स्वच्छ कपड्यात एक छोटी वेलची बांधून रोज रात्री झोपताना उशीखाली ठेवा आणि दुसऱ्या दिवशी एखाद्या कर्णबधिर व्यक्तीला खायला द्या. असे केल्याने तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमच्या कामात यशही मिळेल.सूर्याची सिंह संक्रात या राशींना शुभ फलदायी!
भौतिक सुखसोयी वाढतीलबिघडलेली कामं मार्गी लागतील -काही लोकांच्या बाबतीत असे बरेचदा घडते की, ते काही काम हातात घेतात. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणाने ते पूर्ण होत नाही किंवा अर्धवट राहतं. अशावेळी छोटी वेलची तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यासाठी जेव्हाही तुम्ही काही कामासाठी घराबाहेर जाल तेव्हा मुठीत 3 छोटी वेलची घेऊन ती श्री श्री म्हणत खा.
जेव्हाही तुम्ही घरातून बाहेर पडाल तेव्हा असे केल्याने तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते नक्कीच पूर्ण होईल.या कारणांमुळे घरात पैसा राहत नाहीवैवाहिक जीवनातील समस्यांसाठी -कोणत्याही कारणाने लग्नात सतत अडथळे येत असतील किंवा लग्नाची तारीख सतत पुढे सरकत असेल तर. कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील गुरुवारी महिला आणि पुरुषांनी संध्याकाळी मंदिरात जाऊन दोन वेलची आणि पाच प्रकारच्या मिठाईसह तुपाचा दिवा लावावा आणि तो वाहत्या पाण्यात सोडून द्यावा, असे केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील. हातात कोणत्या रंगाचा धागा बांधणं लकी ठरतं?

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम