‘गदर 2’साठी सनी देओलने घेतले इतके मानधन !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १२ ऑगस्ट २०२३ | गेल्या अनेक महिन्यापासून नियमित चर्चेत येणारा चित्रपट नुकताच प्रसिद्ध झाला असून अनेक प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करीत आहे. तो म्हणजे सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘गदर 2’ अखेर आज म्हणजेच 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट 22 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. त्यानंतर आता एवढ्या वर्षांनी या चित्रपटाचा पुढचा भाग प्रदर्शित झाला आहे. 2001 साली जेव्हा ‘गदर’ सिनेमागृहात प्रदर्शित झाला, तेव्हा सगळीकडे फक्त तारा सिंह आणि सकिना यांचाच बोलबाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील रेकॉर्डतोड कमाई केली होती.

आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा तारा-सकिनाची प्रेमकथा पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्याची संधी मिळाली आहे. प्रेक्षक या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद देत आहेत. दरम्यान, अनिल शर्मा यांनी चित्रपटाचे बजेट आणि मेन हिरो अर्थात सनी देओलच्या फीबद्दलही खुलासा केला आहे.एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत गदर 2 च्या बजेटबद्दल बोलताना अनिल शर्मा म्हणाले, ‘गदर 2 हा चित्रपट 75 ते 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला नाही. आम्ही हा चित्रपट वाजवी बजेटमध्ये बनवला आहे.’ पुढे अनिल शर्मा म्हणाले, ‘गदर 2 बनवण्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या फीवर नियंत्रण ठेवण्याचा खरोखर प्रयत्न केला.

सनीने चांगली दणकून फी घेतली, पण त्याने आमच्यासाठी फी कमी देखील केली. आजकाल, नायक आणि दिग्दर्शक इतके शुल्क घेतात की चित्रपटाचे संपूर्ण बजेट डळमळीत होते. चित्रपटांचे बजेट 600-700 कोटींपर्यंत पोहोचते. कधी नायक 150 ते 200 कोटी रुपये फी घेतात.” असा टोमणा देखील मारला आहे.Taali : ‘ते मला छक्का म्हणाले…’ गौरी सावंत यांची भूमिका साकारताना सुष्मिताला आला असा अनुभवयाशिवाय अनिल शर्मा यांनी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये भारतीय लष्कराने खूप मदत केली असं देखील सांगितलं आहे.
याबद्दल बोलताना अनिल म्हणाले की, ‘आम्ही प्रॉडक्शनवर पैसे खर्च करायचे ठरवले. भारतीय लष्करानेही आम्हाला खूप पाठिंबा दिला. त्यांनी आम्हाला रणगाडे, ठिकाणे आणि अगदी सैनिकही दिले. यासाठी मी लष्कराचा खूप आभारी आहे.

जेव्हा आम्ही उत्तर प्रदेशमध्ये शूटिंग केले तेव्हा तेथील मंत्रालयाने आम्हाला शक्य ती सर्व मदत केली. मुख्य रस्ते अडवायचे. आम्ही खरा ब्रिज उडवला. ” असं त्यांनी सांगितलं आहे.Instagram वर ही पोस्ट पहाZee Studios (@zeestudiosofficial) ने सामायिक केलेली पोस्टहा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे, जो बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर OMG 2 चा सामना करत आहे. ‘गदर 2’मध्ये निर्माते 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाची पुनरावृत्ती असणार आहे. सनी देओल गदर 2 मध्ये तारा सिंग या व्यक्तिरेखेने लोकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. गदर 2 पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांची गर्दी झाली असून 20 लाख तिकिटांचे आगाऊ बुकिंगही झाले आहे, याची माहिती खुद्द अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम