माजी महापौर पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जानेवारी २०२३ । ठाकरे गटाच्या महिला नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात वरळी येथील गोमाता एसआरए प्रकरणी वांद्रे येथील निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात सहकारी अधिकारी असलेले उदय पिंगळे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, गोमाता जनता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेत सहा इमारती आहेत. सन 2008 मध्ये पात्र झोपडधारकांना या इमारतीमधील घरांचे वाटप करण्यात आले होते. प्राधिकरणाकडे असलेल्या नोंदीनुसार किशोरी पेडणेकर या सोसायटीत झोपडीधारक नव्हत्या आणि त्यांना कोणतीही सदनिका वाटप करण्यात आली नव्हती. तरीदेखील पेडणेकर यांनी सदनिकेचा गैरफायदा घेतला असल्याची तक्रार पिंगळे यांनी केली.

किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्वीटमध्ये म्हटले आहे, झोपडपट्टीवासीयांची घरे बळकावल्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर एफआयआर दाखल. 14/1/2023 चा FIR क्रमांक 29 IPC कलम 420, 419, 465, 468, 471, 34 कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर सदनिका बळकावणे आणि फसवणूक केल्याचे आरोप आहेत. किरीट सोमय्या यांनी एसआरएच्या अनेक प्रकरणांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप केला होता. एसआरए प्रकरणी आधीच तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र मागील वर्षी उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे चौकशी झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकरांवर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. ते म्हणाले, महापौरपदावर असणाऱ्या किशोरी पेडणेकर यांनी हा घोटाळा केला. त्यांच्याविरोधात शिवसेनेने काय कारवाई केली? ज्या कंपनीचे रजिस्ट्रेशन किशोरी पेडणेकर यांनी 2012 मध्ये केले होते. त्यावेळीपण बोगस सर्टिफिकेट जारी केले होते. 2017 मध्ये पुन्हा फसवणूक केली. संजय अंदारीचे नाव आणि किशोरी पेडणेकर यांचा भाऊ सुनिल कदमचा फोटो त्यांनी वापरला होता. कोट्यावधी रुपयांचे कोविड सेंटर्स त्यांनी उघडले. या सेंटर्समध्ये एकही रुग्ण भरती झालेला नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम