मोठी बातमी : नेपाळमध्ये विमान कोसळले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जानेवारी २०२३ । नेपाळमध्ये एक भीषण विमान अपघात झाला आहे. यती एअरलाइन्सचे हे विमान 68 प्रवाशी व 4 क्रू सदस्यांसह राजधानी नेपाळहून पोखराला जात होते. पण पोखरा विमानतळावर उतरताना ते अचानक क्रॅश झाले.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, ATR-72 विमान कोसळल्यानंतर तत्काळ त्याने पेट घेतला. बचाव पथक आगीवर नियंत्रण मिळवून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.

या अपघातात नेमक्या किती जणांचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान एका डोंगराला धडकले. क्रॅश होताच त्यात मोठा स्फोट होऊन ते पेटले. आगीमुळे प्रवाशांना बाहेर काढण्यात अडचण येत आहे. हा अपघात एका नदीच्या किनारपट्टी भागात झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले की, जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ फोटो वरुन अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. अपघातस्थळी हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम