मला बदनाम करण्यासाठी गुन्हा दाखल=माजी नगरसेवक अफ़सर खान

बातमी शेअर करा...

 

औरंगाबाद दि २७ ऑगस्ट | मला बदनाम करण्यासाठी विरोधकांशी हातमिळवणी करून माझ्या विरोधात खोटा गुन्हा सिटीचौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत माजी विरोधीपक्षनेते अफसरखान यांनी केले आहे.

त्यांनी पुढे सांगितले माझ्या मालकिचे मिल काँर्नर येथे रेस्टॉरंट, लाँजिंग आहे. त्यापैकी Hall एका संस्थेला भाडे करारनामा करून सोशल एक्टिविटीज करण्यासाठी दिला आहे. तेथे बुध्दिबळ, सोशल क्लब व विविध सोशल एक्टिविटीज संस्थेचे सदस्य करत असतात. येथे जुगार अड्डा नसून दोन दिवस अगोदर सिटीचौक पोलिस ठाण्यातील पथकाने छापा टाकला व पन्नास लोकांवर माझ्यासहीत जुगार खेळत असल्याचा खोटा गुन्हा कोणतीही शहानिशा न करता दाखल करण्यात आला. मी शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहे. पाच वेळा विविध वार्डातून विजय मिळवत नगरसेवक बनलो. तीनवेळा मनपात विरोधीपक्षनेते पदावर काम केले. माझे शहरात मोठे सामाजिक कार्य सर्वांना माहीत आहे तरीही राजकीय भवितव्य खराब करण्यासाठी विरोधकांशी हातमिळवणी करून या गुन्ह्यात माझे नाव गोवण्यात आले. हे षडयंत्र करुन माझी बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप अफसरखान यांनी केला आहे. माझ्या राजकीय जीवनात मी कधीही अवैध धंदे केले नाही करणार हि नाही. शहरात कायदा व सुव्यवस्था बाधित होवू नये यासाठी नेहमी पोलिस प्रशासनाला सहकार्य केले. कर्तव्यदक्ष पोलिस आयुक्त यांनी या प्रकरणी न्याय मिळवून द्यावा नसता आंदोलन तथा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी त्यांच्या संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम