भाजपच्या उमेदवारावर गुन्हा दाखल ; कारण वाचून व्हाल थक्क…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० जानेवारी २०२३ । राज्यात आज पदवीधर मतदार संघातील निवडणुकीचे मतदान होत असतांना त्याचपूर्वी भाजपचे नेते तथा उमेदवार रणजित पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी रणजित पाटील यांच्यावर हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश भवनमध्ये काल मेळावा आयोजित करण्यात आला होता. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या आयोजित मेळाव्यात त्यांच्याकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आल्याने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघात एका जागेसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे उमेदवार रणजित पाटील हे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार असून रणजित पाटील हे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात मविआचे धीरज लिंगाडे निवडणूक लढत आहेत. अमरावती पदवीधरसाठी अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाच जिल्ह्यातून मतदान होणार आहे. मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम