वाघांनी केले वादग्रस्त वक्तव्य ; मंत्री पाटलांना दिली नवी पदवी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० जानेवारी २०२३ । राज्यातील भाजप नेते वादग्रस्त वक्तव्य बोलण्याचा पवित्राच घेतल्याचे दिसून येत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा उर्फीशी वाद मिटताच पुन्हा ते एका नव्या वादात अडकल्या आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले यांच्यासोबत केलीय. घरोघरी सावित्री दिसतात, मात्र चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या जोतिबांचा शोध सुरु आहे असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलंय. चित्रा वाघ या पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी असं वक्तव्य केलं आहे.

पुणे येथे आज भाजपतर्फे मकरसंक्रांती निमित्त ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील आणि चित्रा वाघ यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या. यावेळी चित्रा वाघ यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुले यांच्याशी केली आहे.

‘महिलांच्या जेवढ्या चळवळी झाल्या त्या सर्व चळवळींच महत्वाचं केंद्र पुणे आहे. आजचीही नवीन सुरुवात येथून झाली आहे. आजच्या कार्यक्रमात देखील एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळं. चंद्रकांत पाटील हे नेमीच परिवर्तन घडवत असतात. आज देखील त्यांच्या माध्यमातून नवीन पायंडा पडला आहे. त्यामुळंच मी नेहमी म्हणत असते, आम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे. असे जोतिबा समाजात जास्तीत जास्त तयार होव्हेत याच आजच्या दिवसानिमित्त मी शुभेच्छा देईन असं चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम