सावधान : रात्री जेवल्याने वजन वाढतेय का ? जाणून घ्या सविस्तर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ ऑक्टोबर २०२२ ।  दिवसभर काम करून आल्यावर कोणताही व्यक्ती रात्री निवांत पोटभर जेवण करत असतो न जर तुमचा नेहमीचा वेळ ठरलेला असेल तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही, जर वेळ नेहमी चुकत असेल तर त्याचा तुमच्या शरीरावर खूप परिणाम होत असतात, जाणून घ्या सविस्तर

अनेकांना रात्री उशीरा जेवण्याची सवय असते पण ही सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील काही समस्या खालीलप्रमाणे

झोप न होणे – रात्री उशीरा जेवलात तर तुम्हाला झोप पण उशीरा लागेल त्यामुळे तुम्ही लवकर झोपू शकणार नाही. त्यामुळे लवकर जेवण करा आणि लवकर झोपा. यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येईल.

ह्रदयाचा धोका वाढतो – रात्री उशीरा जेवल्याने हार्टच्याही समस्या वाढतात. उशीरा जेवल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि फॅट वाढतो ज्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

छातीमध्ये जळजळ होणे – उशीरा जेवल्यानंतर लगेच तुम्ही झोपायला जाता. अशात शरीराची हालचाल होत नाही आणि जेवलेल्या अन्नाचे पचनही होत नाही. त्यामुळे छातीत जळजळ निर्माण होते.

पोटाचा त्रास होणे – वेळी अवेळी जेवल्याने साहजिकच पोटाचा त्रास उद्भवतो. पोटदुखीमुळे आपण अनेक आजारांना घेऊन बसतो. त्यामुळे उशीरा जेवणे शक्यतो टाळावेत.

वजन वाढणे – आपण कधी जेवण करता, किती वेळा खातात आणि काय खातात हे खुप जास्त महत्त्वाचं आहे. वजन वाढण्याचं एक कारण असे असते की रात्री उशिरा जेवणे. कारण रात्री आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर रात्री जेवण करा

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम