धनश्री वर्मानं व्हिडीओवर पतीला म्हणाली..’उपवास सोडते रे’ ; व्हिडीओ खास तुमच्यासाठी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ ऑक्टोबर २०२२ ।  प्रसिद्ध भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहलचा करवा चौथ सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्याची पत्नी धनश्री वर्मानं शेयर केलेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. सध्या सर्वत्र करवा चौथ मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आहे.

यासगळ्यात आता सगळं काही डिजिटल होत असताना सण- उत्सव देखील त्या डिजीटल माध्यमातून साजरे होताना दिसतात. करवा चौथही त्याला अपवाद नाही. धनश्रीनं साता समुद्रापार असलेल्या युजवेंद्रला व्हिडिओ कॉल करुन करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत. धनश्रीनं व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून युजचा चेहरा पाहून आपण उपवास सोडत असल्याचे सांगितले आहे.

 

धनश्री ही एक युट्युबर आणि कोरिओग्राफर आहे. तिनं तो व्हिडिओ शेयर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, भारत आणि ऑस्ट्रेलियावाला करवा चौथ असं नाव तिनं दिलं आहे. यापूर्वी युजनं पत्नीसाठी करवा चौथच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट शेयर केली होती. त्यात त्यानं लिहिलं होतं की, हॅप्पी करवा चौथ, धनश्री तुला या सणाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. याशिवाय यावेळी युजनं दिलेलं फ्लाईंग किस हे त्याच्या चाहत्यांच्या विशेष चर्चेचा विषय होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम