सावधान : तुमच्या मोबाईलचा डेटा जातोय चोरीला ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० जुलै २०२३ ।  देशात गेल्या काही दिवसापासून अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगार वेगाने आपले हात-पाय पसरत आहेत. दररोज नवीन मालवेअर किंवा स्पायवेअर सुरक्षेत अडथळा आणत आहेत. गुगल प्ले स्टोअरवर असे दोन नवीन स्पायवेअर्स आढळून आले आहेत जे लाखो भारतीय युजर्सचा डेटा चोरून चीनला पाठवत आहेत.

ज्या Apps मध्ये हे स्पायवेअर आहेत ते युजर्सना व्हायरसने प्रभावित झाल्याचं कळू देत नाहीत. हे दोन Apps File Recovery and Data Recoveryआणि File Manager आहेत आणि त्यांचे एकत्रितपणे 15 लाख युजर्स आहेत. Pradeo नावाच्या मोबाईल सायबर सिक्योरिटी कंपनीने खुलासा केला आहे की, Google Play Store वर असे दोन Apps आहेत जे स्वतःला फाइल मॅनेजमेंट टूल्स म्हणून दाखवतात. पण युजर्सचा संवेदनशील डेटा चोरून तो चीनला पाठवला जात आहे. हे App लाखो लोकांनी डाऊनलोड केलं आहे आणि युजर्स देखील त्यांचा वापर करत आहेत.
File Recovery and Data Recovery युजर्सचा डेटा चोरत आहेत. त्यांचे अनुक्रमे 10 लाखांहून अधिक युजर्स आणि 5 लाख डाउनलोड आहेत. तसेच हे Apps दावा करतात की, ते कोणत्याही प्रकारचा डेटा चोरत नाहीत. Pradeo च्या अहवालानुसार, हे Apps युजर्सचा वैयक्तिक डेटा जसे की रिअल टाइम तपशील, सोशल नेटवर्क्स, ईमेल, संपर्क इत्यादी चोरतात. हे Apps हा डेटा चिनी सर्व्हरला पाठवत आहेत.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
– कोणत्याही थर्ड पार्टी App वरून कोणतेही App डाउनलोड करू नका.
– कोणतेही App डाउनलोड करण्यापूर्वी, त्याचा रिव्ह्यू वाचा.
– तुम्हाला काही चुकीचे आढळल्यास ते App डाउनलोड करू नका.
– जर एखाद्या App ने तुम्हाला परवानगी मागितली तर तुम्ही फक्त त्याच परवानग्या द्याव्या ज्या आवश्यक आहेत.
– तुमच्या डिव्हाइसवर नेहमी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर असावे.
– फोनमध्ये येणाऱ्या सर्व सॉफ्टवेअर अपडेट्ससह फोन अपडेट ठेवा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम