‘या’ दिवसापासून होणार धोंड्याचा महिन्याला सुरुवात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० जुलै २०२३ ।  तीन वर्षातून एकदा येणारा महिना म्हणजे धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात प्रत्येक परिवारातील जावयाला विशेष मान दिला जातो. या महिन्यात जावयाला घरी बोलवून त्याला गोडा-धोडाचं जेवण दिलं जातं. त्याचं मानपान आणि त्याला सोनं किंवा चांदीची वस्तू देण्याची पद्धत आहे.

यंदा धोंड्याचा महिना 18 जुलैपासून सुरू होत आहे. याआधीच सराफ बाजारात रविवारपासून लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. धोंड्याच्या महिन्यात जावायासाठी कोणतं वाण घ्यावं असा प्रश्न घराघरात आहे. सोन्याचे दर सतत कमी जास्त होत आहेत. तर चांदीही 70 हजारांच्या वर जात असल्याने दर खाली उतरण्याची वाढ ग्राहक पाहात आहेत. 10 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर ६० हजार ३४९ तर २२ कॅरेट सोन्याचे दर ५५ हजार ३२० रुपये होता. अधिक महिन्यात खास वाण देण्याची पद्धत आहे. सोने नाणे किंवा चांदीचा दागिना किंवा एखादी वस्तू जावयाला दिली जाते. हे प्रमाण अलीकडच्या काळात अधिक वाढलं आहे.

सोनं आणि चांदी वाढत असल्याने मोठी वस्तू करणं शक्य नाही त्यामुळे कमी कॅरेटमध्ये किंवा छोटी वस्तू घेण्याकडे कल वाढताना दिसत आहे. हा धोंड्याचा महिना 18 जुलैपासून सुरू होत आहे. 16 ऑगस्टपर्यंत असणार आहे, या महिन्याला भगवान विष्णूच्या भक्तीचा महिना असंही म्हटलं जातं. धोंड्याचा महिन्या म्हणजे अधिक महिना जो तीन वर्षांतून एकदा येतो. हा महिना अतिशय शुभ मानला जातो. याला पुरुषोत्तम मास असंही काही ठिकाणी म्हणतात. या महिन्याला अधिक महत्त्व असते. त्यामुळे यंदा सराफ बाजारातही सोन्या चांदीचे दर विचारण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम