केद्र व राज्य सरकार एकत्र येत नाही…प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
दै. बातमीदार । १५ जानेवारी २०२३ । मुंबई महापालिका निवडणुकीचे उद्दिष्ट ठेऊन नरेंद्र मोदी मुंबईत येणार असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबईत अनेक योजनांचे उद्घाटन करणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी दावोसचा दौरा कमी केला असून ते १८ जानेवारीला मुंबईत परतणार आहेत. दावोसची बैठक १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत आहे.
नरेंद्र मोदी राजकीय सभा घ्यायला येत नाहीत आहेत. नरेंद्र मोदी विकासासाठी येत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला मदत करण्यासाठी नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकार जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही. केंद्राच्या पाठिंब्याशिवाय मुंबई सुंदर शहर होऊ शकत नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
बीडमध्ये श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंचा पुण्यतिथी सोहळा सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गहिनीनाथ गडावर येणार आहेत. त्यांच्यासोबत पंकजा मुंडे सुद्धा याठिकाणी हजेरी लावणार होत्या. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम