अजित पवारांचा सल्ला ; दोनच अपत्यांवर थांबा, !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जानेवारी २०२३ । राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज महिलांना चक्क “दोनच अपत्यांवर थांबा, जास्त पलटण वाढवू नका, वंशाच्या दिव्याच्या पाठीमागे लागू नका” असा निर्वाणीचा सल्ला बारामती येथे भाषणात बोलताना महिलांना दिला आहे. बारामती येथे गरजू महिलांना स्वेटर वाटपाच्या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी हा सल्ला दिला.

“आपली मुलगी किंवा सुनबाईलापण दोनच अपत्यावर थांबण्याचा सल्ला द्या. मर्यादित कुटुंब ठेवा, उगाच वंशाचा दिवा म्हणून कुटुंब वाढवू नका, देवाची कृपा म्हणून उगाच पलटण वाढवता, आम्हाला माहिती नाही का देवाची कृपा आहे की कुणाची आहे ते” असा सल्ला त्यांनी महिलांना दिला आहे.

दरम्यान, महिलांना अजित पवारांनी शरद पवार यांचं उदाहरणं दिलं आहे. शरद पवार साहेब हे सुद्धा एकाच अपत्यावर थांबले. त्यांनी जास्त मुले होऊ दिली नाही, मुलीसुद्धा कर्तृत्ववान असतात असंही ते म्हणाले आहेत. सुप्रियासुद्धा पवार साहेबांचेच नाव काढते म्हणून दोन पेक्षा जास्त अपत्य होऊ देऊ नका असं पवार म्हणाले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम