विद्युत विभागाचा मास्टर माईंड भूषण तायडे चा पदभार काढण्याचे CEO यांचे आदेश

चर्चा झाली मात्र लेखी आदेश नाहीत- सुनील पाटील, कार्यकारी अभियंता

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ ऑक्टोबर २०२३

येथील जिल्हा परिषदेतील विद्युत विभागातील कर्मचारीच पत्नी च्या नावे कोट्यवधी रुपयांचे ठेके घेत असल्याची तक्रारी वरून जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अंकित पनू यांनी भूषण तायडे यांचा पदभार काढण्याचे आदेश दिले असल्याची माहिती तक्रारदार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेचे अध्यक्ष सूरज नारखेडे यांनी दिली. याबाबत कार्यकारी अभियंता यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी, तोंडी चर्चा झाली मात्र लेखी आदेश नाहीत असे सांगितले. या कारवाईने जि. प. मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, जि. प. तील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असलेले भूषण तायडे ( वर्ग -3) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी राखून बांधकाम विभागाचे कर्मचारी असतांना मात्र विद्युत विभागात नेमणूक करून घेतली आहे. आणि काही थोडे दिवस वगळता ते गेल्या 15 वर्षांपासून विद्युत विभागात ठाण मांडून बसले आहेत अशी तक्रार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सूरज नारखेडे यांनी मुख्यमंत्री यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर रोजी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पंनू यांच्या समक्ष तक्रारदार सूरज नारखेडे यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली असून भूषण तायडे यांचेकडील विद्युत विभागाचा पदभार काढण्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती तक्रारदार सूरज नारखेडे यांनी पत्रकारांना दिली. या बाबत जि. प. च्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांना प्रत्यक्ष भेटून प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी CEO साहेबांशी चर्चा झाली आहे, मात्र लेखी आदेश नाहीत असे सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम