संजय राऊत त्या लायकीचे नाही ; फडणवीसांचा पलटवार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ७ ऑक्टोबर २०२३

राज्यातील भाजपचे नेते देवेद्र फडणवीस यांच्यावर नेहमीच ठाकरे गटातील अनेक नेते टीका करीत असतांना आज फडणवीस यांनी देखील पलटवार केला आहे. संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत. तर ठाकरे गटाने यापूर्वीच रामराज्याच्या संकल्पना सोडून दिली, असे ते अकोल्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

संजय राऊत यांनी शनिवारी भाजपवर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते की, राम मंदिर बांधल्यामुळे कुणी राम होत नाही. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर जनता बांधत आहे. भाजपचे काम करण्याची पद्धत रावणासारखी आहे. रावणाने ज्यापद्धतीने लोकांवर अत्याचार केले. त्याच पद्धतीने महाराष्ट्र व दिल्लीतील सरकार लोकांवर अत्याचार करत आहे. रावण कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे. आमचे सरकार आल्यावर रामराज्य निर्माण होईल. संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना देवेंद्र फडणीस म्हणाले की, संजय राऊत यांना मी केव्हाच उत्तर देत नाही. कारण, ते उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत. म्हणजे ते काहीही बोलतात. काहीही बोलणाऱ्या व्यक्तीला काय उत्तर द्यायचे? दुसरीकडे, उद्धव ठाकरेंची संघटना रामराज्याबद्दल बोलते याचा मला आनंद वाटतो. पण दुर्दैवाने त्यांच्या संघटनेने रामराज्याची संकल्पना यापूर्वीच सोडली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम