चाळीसगावच्या अधिकाऱ्याने घेतली चार लाखांची लाच !
बातमीदार | १७ सप्टेंबर २०२३ | नाशिक एसीबीने एका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने ३५ लाखांचे बिल काढून देण्यासाठी तडजोडीअंती चार लाखांची लाच घेताना चाळीसगाव बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (अशोक नगर, धुळे) यांना नाशिकमधील गडकरी चौकात लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी उशिरा करण्यात आल्यानंतर बांधकाम विभागातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या तक्रारदाराने डॉ.शामा प्रसाद मुखर्जी रुरबन या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग, ता.चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा, ता.चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसीत करण्याचे काम घेतले होते. या कामाची चार कोटी 82 लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाच्या अतिरीक्त सुरक्षा अनामत रक्कम 35 लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात आरोपी विसपुते यांनी पाच लाखांची लाच मागितली मात्र चार लाखात तडजोड करण्यात आली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारदार हे नाशिकमध्ये आल्यानंतर गडकरी चौकात शनिवारी सायंकाळी लाच स्वीकारताच विसपुते यांना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत. प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे , अविनाश पवार, सुरेश चव्हाण आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम