पहाटेच्या सुमारास बस आणि कंटेनरचा अपघात : १९ प्रवासी जखमी !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ सप्टेंबर २०२३ | राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका नियमित सुरु असून मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एसटी बसने कंटेनरला मागून धडक दिल्याने हा अपघात घटला आहे. माणगावनजीक रेपोली येथे पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

अपघातात एसटीमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 19 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवासी गंभीर जखमी आहे.जखमींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईहून राजापूरकडे निघालेल्या एसटी बसला हा अपघात झाला आहे. अपघातात बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईहून नागरिक गावी निघाले होते. अपघाताची माहिती मिळाताच वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु केले. अपघातानंतर काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम