राज्यात २४ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
बातमीदार | ३ ऑक्टोबर २०२३
देशातील अनेक राज्यात सध्या मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून मात्र, अद्याप राज्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. वास्तविक खंडानंतर आलेल्या पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. आगामी 24 तासांमध्ये देखील राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात पुढील 24 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत ठाणे, मुंबई, उपनगरसह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येईल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुणे, मुंबईसह राज्यात परतीच्या पावसाचा जोरदार मारा होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 48 तास या विभागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम