‘चांद्रयान-३’ चे आज होणार देशातून लाँच
दै. बातमीदार । १४ जुलै २०२३ । देशात गेल्या काही वर्षाआधी चांद्रयान लाँच करण्यात आले होते पण ते अयशस्वी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा चांद्रयान-2 लाँच झाल्यानंतर 3 वर्षे, 11 महिने आणि 23 दिवसांनी भारत चांद्रयान-3 मिशन लॉन्च करणार आहे. दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3-M4 रॉकेटद्वारे ते अवकाशात पाठवले जाईल. या मोहिमेद्वारे भारताला आपली अंतराळ शक्ती जगाला दाखवायची आहे. मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल.
चांद्रयान-३ अंतराळयानामध्ये तीन लँडर/रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहेत. सुमारे 40 दिवसांनंतर म्हणजेच 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील. हे दोघेही 14 दिवस चंद्रावर प्रयोग करतील, तर प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल. मिशनच्या माध्यमातून इस्रो चंद्राचा पृष्ठभाग किती सिस्मिक आहे हे शोधून काढेल, माती आणि धूळ यांचा अभ्यास केला जाईल. चांद्रयान-3 चे बजेट सुमारे 615 कोटी रुपये आहे तर अलीकडील आदिपुरुष चित्रपटाचे बजेट 700 कोटी रुपये होती. म्हणजे चांद्रयान-3 या चित्रपटाच्या किमतीपेक्षा 85 कोटी रुपये स्वस्त आहे. 4 वर्षांपूर्वी पाठवलेल्या चांद्रयान 2 चा खर्चही 603 कोटी रुपये होता. मात्र, त्याच्या लॉन्चिंगसाठी 375 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
चांद्रयान-3 चे प्रक्षेपण इस्रोच्या अधिकृत वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर थेट दाखवले जाईल. तुम्ही दूरदर्शनवर चांद्रयान-3 चे थेट प्रक्षेपण देखील पाहू शकता. ज्यांना सतीश धवन स्पेस सेंटरच्या लाँच व्ह्यू गॅलरीमधून प्रक्षेपण थेट पहायचे आहे, त्यांच्यासाठी स्पेस एजन्सीने ivg.shar.gov.in/ येथे नोंदणी सुरू केली आहे. आता नोंदणी बंद आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम