प्रसिद्ध कॉमेडियन भारतीसह पतीविरुद्ध आरोपपत्र दाखल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ ऑक्टोबर २०२२ । ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने आज मोठी कार्यवाही करण्यात आली असून यात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

२०२०मध्ये भारती सिंग हिच्या घरामध्ये एनसीबीने छापा टाकला हातो. यामध्ये ड्रग्ज आढळून आले होते. या प्रकरणात त्यांना अटकदेखील करण्यात आलेली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने याच प्रकरणी २०० पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे. एनसीबीने आरोपपत्र दाखल केल्याने कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम