सलमान खानच्या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ सप्टेंबर २०२३

राज्यात मोठ्या धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सव काळात पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असतात. आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरीही ते बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावतात. यंदाही मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवात बाप्पांच्या दर्शनासाठी अनेकांच्या घरी दौरा सुरू केल्याचे दिसून येते.

सलमान खानच्या घरीही सोमवारी बाप्पांचे आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमानच्या घरी मोठ्या थाटात गणपती बाप्पांची पूजा-आरती होत आहे. आपल्या लाडक्या भाचीसह सलमान बाप्पांची आरती करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर, उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरीही बाप्पांच्या आगमनासाठी सलमान खान आवर्जुन उपस्थित होता. त्यामुळे, गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी सेलिब्रिटींच्याही घरी राजकीय नेते आणि दिग्गजांची उपस्थिती दिसून येते. त्यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानच्या बहिणीच्या घरी बाप्पांचे दर्शन घेतले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम