अभिनेत्रीची राहुल गांधींना डेटची इच्छा अपूर्णच !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ सप्टेंबर २०२३ | देशातील बॉलीवूडमधील नेते व अभिनेते नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असता. त्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे हे सगळ्यांना जाणून घेण्याची इच्छा असते. ते कुठे जातात…

कोणाला भेटतात… त्यांच्या पार्टीत कोण येत… आता सध्या चर्चा कोणत्या कपलची आहे… अशा अनेक गोष्टी या चर्चेचा विषय ठरतात… त्यात सगळ्यात जास्त चर्चा ही कलाकारांच्या अफेअर्सची होते. त्यातही अनेक सेलिब्रिटी हे आपल्याला एकत्र अनेकदा स्पॉट झाल्याचे दिसते. तर दुसरीकडे त्यांना कोणता सेलिब्रिटी आवडतो किंवा ते कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत,

याविषयी देखील अनेकदा मुलाखतींमध्ये उघड होतं. त्यात बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ आणि सिमीगरेवालच्या शोमध्ये अनेक कलाकार हे त्यांना कोणत्या सेलिब्रिटीला डेट करायची इच्छा आहे, हे सांगून जातात. त्यात आता एका अभिनेत्रीची माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीला डेट करण्याची इच्छा अपूर्णच राहिली. सिमी गरेवालच्या शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात अनेक कलाकारांनी त्यांना कोणत्या सेलिब्रिटीला डेट करायला आवडेल याविषयी सांगितलं आहे. Rendezvous with Simi Garewal या शोमध्ये करीनानं खुलासा केला की तिला राहुल गांधी यांना डेट करायचे आहे. करीनानं केलेल्या या वक्तव्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम