पंतप्रधान मोदींची घेतली मुख्यमंत्री शिंदेंनी भेट ; चर्चेला उत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जुलै २०२३ ।  देशात पावसाचा कहर सुरु असतांना राज्याच्या राजकारणात देखील मोठा कहर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या तीन दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगड जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती झालेल्या ठिकाणी तळ ठोकून असतांना थेट शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाल्याने राज्यतील विरोधकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत देखील कुजबुज सुरु झाली आहे.

दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. दुपारी 4 वाजता एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचीही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. परंतु या भेटीगाठीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, राज्यात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या तिढ्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांकडून मुख्यमंत्री शिंदे वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

पावसाळी अधिवेशनापूर्वी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार निश्चित होणार, असे सांगितले जात होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह मंत्रिमंडळात सहभागी झाल्याने शिंदे गटाची चांगलीच गोची झाली आहे. कोणत्या गटाला कोणते मंत्रीपद द्यायचे, यावरून शिंदे गट व अजितदादा गटात चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम