जळगावात शिवसेनेची सभासद नोंदणीस पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जुलै २०२३ ।  आगामी निवडणुकांच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी शहरातील शिवतीर्थ मैदान परिसरात महा सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे शिंदे गटाची शिवसेना आहे घरात आणि दारात जावे यासाठी सर्वाधिक युवकांना जोडण्याचा काम शिंदे गट शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातून एकूण एक लाख शिवसैनिकांची नवीन नोंदणी करण्यात येणार या नोंदणीची सुरुवात जळगाव शहरातून करण्यात आली असल्याचा दावा जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे

शिवसेनेतून शिंदे गट निर्माण झाल्यानंतर शिंदे गटाची स्वतंत्र कार्य करणे जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच स्थानिक पातळीवर संघटना अधिक मजबूत व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटना बांधणीवर अधिक जोर दिल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकांसाठी संघटना अधिक बळकट व्हावी या उद्देशाने सदस्य नोंदणी अभियान करण्यात येणारं असल्याची माहिती जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उपजिल्हाप्रमुख स्वप्निल परदेशी युवा सेन शिवसेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील महिला महानगराध्यक्ष ज्योती शिवदे राहुल नेथलेकर सोहम विसपुते सागर हिरवाळे गिरीश सपकाळे हितेश ठाकरे संदीप सुरडकर पुष्पक सूर्यवंशी भारती ताई रंधे हर्षल मावळे शंतनू नारखेडे जितेंद्र पाटील सावखेडा सरपंच सुनील भाऊ आगेवाल केतन पोळ सागर शेंगदाणे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम