आजपासून ‘या’ अभियानाची मुख्यमंत्री शिंदे यांनी केले सुरुवात

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० ऑक्टोबर २०२२ । दिवाळी सन दोन पुढील आठवड्यात येवून ठेपला असताना आज दि २० रोजी राज्य सरकारच्या वतीने ‘प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान- २०२२’चं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजपासून या अभियानाला सुरुवात झालीय. मंत्रालयामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत आणि अंध विद्यार्थ्यांसमक्ष ही शपथ देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री यांची उपस्थिती होती. यावेळी प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्यात आली. निसर्गाचा समतोल राखण्याचं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय. ”सर्वांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची गरज आहे. कारण प्रदूषामुळे निसर्गाचा अपरिमित ऱ्हास होत आहे. शालेय विद्यार्थ्यांपर्यंत व्यापक जनजागृती होणं गरजेचं आहे. सरकारच्या वतीनेही यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय प्लास्टिकबाबती सरकार गंभीर आहे.” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. मंत्रालय परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दीपावलीची शपथ देण्यात आली. अंध मुलांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम