शाहरुखच्या अडचणीत वाढ ? NCB देणार माहिती

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० ऑक्टोबर २०२२ ।  कोणत्या चित्रपटामुळे नाही तर ड्रग्ज प्रकरणामुळे गेल्या वर्षापासून अभिनेता शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान सातत्याने चर्चेत आहे. यामुळे शाहरुखच्या अडचणीतही मोठी वाढ झाली होती. आता मात्र या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आर्यन दिल्ली न खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने एक मोठी माहिती दिल्ली मुख्यालयाला दिली आहे.

आर्यन खानला 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तब्बल 26 दिवस तो कोठडीत होता . NCBकडून आर्यन खानची कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान काही महिन्यांआधीच आर्यनची या केसमध्ये निर्दोश सुटका करण्यात आली मात्र आता या प्रकरणात NCBकडून मोठी माहिती समोर आली आहे. आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणार नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेचNCBने केलेला खुलासा पाहून सगळेच चकित झाले आहेत. NCBने दिल्ली मुख्यालयात आर्यन खान ड्रग्ज प्रकणार एक अहवाल सादर केला आहे ज्यात या प्रकरणाची चौकशी योग्यरित्या झाली नसल्याचे म्हंटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम