भ्रष्टाचारात अडकलेल्या डीएसपीची मुख्यमंत्री योगींनी केली हकालपट्टी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ नोव्हेबर २०२२ देशात मोदी सरकार भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करीत असल्याची काही ठिकाणी भूमिका बजावीत असतांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचाराबाबत शून्य धोरण स्वीकारलंय. सीएम योगींनी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला हवालदार बनवण्याचे निर्देश दिलेत.

सीएम योगींनी लाच घेतल्याच्या आरोपावरून रामपूर नगरचे तत्कालीन कार्यक्षेत्र अधिकारी डीएसपी विद्या किशोर शर्मा यांना मूळ पदावर परत पाठवण्याचा निर्णय घेतलाय. विद्या किशोर शर्मा यांची 2021 मध्ये रामपूर इथं नियुक्ती करण्यात आली होती. तिथं लाचखोरी प्रकरणात प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली. यादरम्यान त्यांची चौकशी झाली. चौकशीत विद्या किशोर शर्मा दोषी आढळून आले. त्यानंतर कठोर कारवाई करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डेप्युटी एसपींना हवालदार बनवण्याचे निर्देश दिले.

गृह विभागानं ट्विट करून ही माहिती दिलीय. रामपूरचे तत्कालीन अधिकारी विद्या किशोर शर्मा यांना लाच घेतल्याच्या आरोपावरून त्यांच्या मूळ पदावर परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सीओ विद्या किशोर शर्मा यांच्यावर रामपूरमध्ये पोस्टिंगदरम्यान लाच घेतल्याचा आरोप होता. चौकशीअंती आरोपात तथ्य आढळल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. विद्या किशोर शर्मांची यूपी पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाली होती. प्रमोशन मिळाल्यानंतर ते डेप्युटी एसपी म्हणून रुजू झाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम