निवडणूक बिनविरोधसाठी मुख्यमंत्र्यांचे सर्व पक्षीय नेत्यांना फोन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ फेब्रुवारी २०२३ । राज्यातील पुणे जिल्ह्यातील दोन आमदारांचे निधन झाल्याने या रिक्त विधानसभ मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. दरम्यान कसबा पेठ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या कसबा मतदारसंघात भाजपचं शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे समोर आले आहे.यासाठी राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.

कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे हेमंत रासने उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाजपकडून कसब्यात जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती ते दगडूशेठ गणपती मंदिर पायी पदयात्रा निघणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.

विधानसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, राज ठाकरे आणि नाना पटोले यांनी फोन करून निवडणूकीत उमेदवार न देण्याचं आवाहन केल्याचं समजतंय. दरम्यान कसबा आणि चिंचवड या दोन्ही निवडणुकी बिनविरोध व्हावी यासाठी भाजपच्या मदतीला मुख्यमंत्री शिंदे सरसावल्याचे दिसत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम