तैलिक महासभेच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळा संपन्न

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ सप्टेंबर २०२२ । भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे हे धुळे दौऱ्यावर आले होते. धुळे जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने त्यांच्या भव्य नागरी सत्काराचा कार्यक्रम ग.नं .७, पारोळा रोड पोलिस चौकीसमोर, धुळे येथे आयोजित करण्यात आला होता. सत्काराचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली होती तर कार्यक्रम संपेपर्यंत रिपरिप सुरुच होती. समाजातील तळागाळातील कार्यकर्ता मोठा होत असताना आपण त्या कार्यकर्त्याच्या सत्कारासाठी जायलाच हवे, अशी भूमिका जणू काही समाजाचा लोकांनीच घेतली होती. त्यामुळेच भर पावसात मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत सत्काराचा कार्यक्रम पार पडला.

तत्पूर्वी महिला आघाडीच्या वतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. याच कार्यक्रमात त्यांना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश महासचिव डॉ. भूषण कर्डिले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन जबाबदारी देण्यात आली, तर कार्यक्रमास योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा प्रमुख अतिथीकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी समाजसंवाद व नागरी सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. राजवर्धन कदमबांडे, खासदार डॉ. सुभाष भामरे, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे , कोषाध्यक्ष गजानन शेलार, महासचिव डॉ. भूषण कर्डिले, आ. जयकुमार रावल , बबन चौधरी, चोपडा नपाचे नगराध्यक्ष जीवन चौधरी, शहराध्यक्ष अनुप अग्रवाल, युवा आघाडी महासचिव नरेंद्र चौधरी, जिल्हा अध्यक्ष कैलास काळू चौधरी, युवानेते सतीश महाले, महापौर प्रदीप करपे, विभा कार्याध्यक्ष शशिकांत चौधरी, विभा उपाध्यक्ष अनिल अहिरराव, सचिव बाबुलाल पवार, राजकुमार बोरसे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मुसळधार पाऊस होत असल्याकारणाने कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला पण समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती शेवटपर्यंत होती. कार्यक्रम संपल्यावर समाज बंधू – भगिनींनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, समाजासोबत जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा माझा मानस असून समाजाने आज माझा केलेला भव्य सत्काराने मी भारावून गेलो आहे. जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ त्यांनी समाजाशी संवाद साधला.

धुळेकर जनतेने आमच्यासोबत रहावे, असे आवाहन करत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडीचे महासचिव नरेंद्र चौधरी यांचे कौतूक करत त्यांच्या व त्यांच्या परिवाराचे सुखदुःखात मी व्यक्तीशः कायम सोबत राहील असेही भाषणाचे समारोप करताना आश्वस्त केले. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव डॉ. भूषण कर्डिले आपल्या परखड भाषणाची सर्वांकडे खोके पण समाजासाठी आमदार बावनकुळे एकदम ओके म्हणत सुरुवात केली, तत्पूर्वी त्यांनी समाजातील अनेक प्रश्नदेखील बावनकुळे यांच्याकडे मांडले व या प्रश्नांना बावनकुळे वाचा फोडतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. युवा आघाडी प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी यांनी प्रास्तविकात समाजाने एकत्र यायला, अडचणीच्या वेळी प्रत्येकाने एक व्हायला पाहिजे, तरच ओबीसीचा आरक्षणाचा मुद्दाही सोडवता येईल, प्रास्ताविकाच्या माध्यमातून अनेक मागण्याही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. बावनकुळे यांच्याकडे मांडून त्या सोडवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम