
७५ वा आजादी महोत्सव निमित्त भुसावळ डिव्हिजन च्या अंतर्गत जळगाव रेल्वे स्टेशन वर स्वच्छता अभियान
दै. बातमीदार । २७ सप्टेंबर २०२२ । ७५ वा आजादी महोत्सव यात स्वच्छता पंधरवडा मध्यगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म आणि रेल्वे पटरी स्वच्छ. ७५वा आजादी महोत्सव यात स्वच्छता पंधरवडा मध्य रेल्वे तर्फे १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर भुसावळ डिव्हिजन अंतर्गत विविध सेवा (स्वच्छता एवं जनजागृती) आणि विविध स्टेशनवर विविध दिवशी स्वच्छता अभियान राबवत आहे.
दिनांक २१ सप्टेंबर २०२२ बुधवार रोजी जळगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर आणि रेल्वे पटरीवर स्वच्छ अभियान राबवण्यात आले त्यात भुसावळ आणि जळगाव येथील रेल्वे अधिकारी सीबीएस श्री. व्ही एम पाटील, जीपीएस श्री कपोटे, सी आर एस श्रीमती सुनंदा चौधरी, हेल्थ इन्स्पेक्टर मनीष शर्मा, कमर्शियल इन्स्पेक्टर, केटरिंग श्री. पारे, जळगांव रेल्वे स्टेशनचे मॅनेजर श्री. ए एम अग्रवाल आणि रेल्वेचे कर्मचारी यासोबत जैन इरिगेशनचे प्रतिनिधी एवं सामाजिक कार्यकर्ता आणि पत्रकार मदन लाठी यांनी सहभाग घेतला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम