
बकालेंच्या अडचणी वाढणार; कोर्टाने अर्ज फेटाळला
दै. बातमीदार । २७ सप्टेंबर २०२२ । मराठा समाजबाबत वादग्रस्त व आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरण बकाले यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे किरणकुमार हे राज्यभरातील जनतेच्या रोषाचे धनी ठरले. परिणामी, यामुळे त्यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी कोर्टात अर्ज केला असता, दोन्ही पक्षांतर्फे झालेल्या घमासान युक्तिवादानंतर कोर्टाने हा अर्ज राखून ठेवत किरण बकालेंचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
दरम्यान, निलंबनाच्या कारवाईनंतरही बकालेंना नाशिक येथे हजर राहण्यास सांगूनही ते हजर झाले नाही.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम