चित्रपट बंद करणे म्हणजे…; शरद पोंक्षेनी सुनावले

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० नोव्हेबर २०२२ राज्यात नुकताच आलेला चित्रपट ‘हर हर महादेव’ प्रदर्शित करू नये यासाठी राष्ट्रवादी आक्रमक झाली होती तर त्याला अभिनेते शरद पोंक्षे यांनी पलटवार करीत उत्तर दिले आहे.

शरद पोंक्षे म्हणाले, ‘हा मुर्खपणा आहे. चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून सेन्सॉर झाला आहे. मी त्या चित्रपटात काम केले आहे. सेन्सॉरला आमच्या दिग्दर्शकांनी पुरावे दिले आहेत. चित्रपटात इतिहासाची कोणतीही मोडतोड झालेली नसून याबाबत आक्षेप घेणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना चित्रपटाचे दिग्दर्शक भेटणार आहेत. चित्रपट रिलीज होऊन दोन आठवडे झाल्यानंतर हे लोकांना सुचतं का? सत्ता गेलेली आहे म्हणून पब्लिसिटीसाठी हे सगळं लोक करत आहेत. चित्रपटात काहीही मोडतोड करण्यात आलेली नाही,’ अशा शब्दांत पोंक्षे यांनी विरोधकांना सुनावले आहे. ते पुढे म्हणाले, ‘चित्रपट चालू असतात लोकांना मारणे हा हलकटपणा आहे. तुम्ही गुंड आहात का? या लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर चित्रपट बघणाऱ्यांना नाही का? स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेतात. शाहू, फुले, आंबेडकर यांनी हेच शिकवले का?,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘हर हर महादेव’ हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांनी केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अभिनेता सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच तो वादाच्या भोव-यात सापडला. सध्या या चित्रपटावरुन राजकारण पेटले आहे. राजकीय पक्षांसह अनेक संघटनांकडून या चित्रपटाला विरोध होत आहे. ‘हर हर महादेव’ सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आली असून चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचा आरोप होतोय. दरम्यान आता या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चित्रपटाला विरोध करणा-यांना खडे बोल सुनावले आहेत. पंढरपूर येथे हिंदू महासभेच्या वतीने शरद पोंक्षे याना क्रांतिवीर वसंत दादा बडवे हिंदूत्व शॉर्या पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम