तुम्हाला माहित आहे का? फॅन फुल स्पीडला ..बिल येते का ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० नोव्हेबर २०२२ सर्वच लोक आपल्या घरातील लाईटबिल कमी यावे यासाठी विविध कल्पना लढवत असतात, तुम्हाला माहित आहे का जर तुम्ही लाईट बिल फॅन फुल स्पीडला असते तेव्हा बिल येते का बघू सविस्तर माहिती.

BJP add

अनेकांच्या घरात फॅन फुल्ल स्पीडने चालवला जातो. तर, अनेकांना लाईट बिल कमी येण्यासाठी फॅन एकवर चालवावा की, पाचवर असा प्रश्न पडतो. नेकांना पंखा कमी वेगाने चालवल्यास विजेचा वापर कमी होतो असे वाटते. तर, दुसरीकडे पंखे कोणत्याही स्पीडवर चालवल्याने काही फरक पडत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. चला तर मग जाणून घेऊयात नेमका फॅन कोणत्या स्पीडवर चालवल्याने वीज बिल कमी येते की जास्त.सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, फॅनवर खर्च होणारी शक्ती थेट त्याच्या वेगाशी संबंधित असते, परंतु ते रेग्युलेटरच्या प्रकारावरदेखील अवलंबून असते. होय, रेग्युलेटरच्याच आधारावर असे म्हणता येईल की पंख्याचा वेग नियंत्रित करून विजेचा खर्च अधिक कमी करता येतो.
असे बरेच रेग्युलेटर आहेत, ज्याचा वीज वापरावर कोणताही परिणाम होत नाही. असे रेग्युलेटर केवळ पंख्याच्या स्पीडपुरते मर्यादित असतात. अनेक रेग्युलेटर व्होल्टेज कमी करून फॅनचा वेग नियंत्रित करतात. मात्र, असे केल्याने वीज बिल कमी होत नाही. कारण, येथे रेग्युलेटरने रेझिस्टरसारखे काम केले. त्यामुळे फॅनला जेवढी वीज गरजेची आहे ती लागतेच.

विजेची बचत नेमकी कशी होते?
आज बाजारात इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. याचा वापरदेखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हे इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर वीज वाचवतात असे अनेकांना वाटते. इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरमध्ये फायरिंग अँगल बदलून करंटचा प्रवाह नियंत्रित केला जातो. अशा प्रकारे, जेव्हा विद्युत प्रवाहाचा वापर कमी होतो, तेव्हा वीज बिल कमी होते. यामध्ये पॉवर कंट्रोलसाठी कॅपेसिटर इत्यादींचा वापर केला जातो. फायरिंग अँगल बदलल्याने विद्युत प्रवाह आणि व्होल्टेज एकाच वेळी कमी होते आणि विजेची बचत होते. त्यामुळे पंखा जितक्या वेगाने चालेल तितका विजेचा वापर वाढेल आणि कमी वेगात चालवल्यास वीज बिल कमी येईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम