दिल्लीतील कोचिंग क्लासेसला आग ; जीव वाचविण्यासाठी धडपड !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जून २०२३ ।  देशात अनेक ठिकाणी यंदाच्या उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात लागलेल्या असल्याचे ग्राफ उंचावत आहे. तर आज देखील दिल्लीतील मुखर्जी नगरमधील कोचिंग सेंटरमध्ये दुपारी आग लागली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना दोरीचा आधार घेऊन आपला जीव वाचवावा लागला. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशामक दलाच्या सात गाड्या आल्या होत्या. त्याचबरोबर पोलिस देखील तिथं आले होते. आतापर्यंत कोणी जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही. आग दुपारी १२ वाजता लागली होती. अग्नीशामक आणि पोलिस या घटनेची कसून चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सेंटरमध्ये आग एका वीजेच्या मीटरमध्ये लागली होती. तिथं अधिक नव्हती. परंतु ज्यावेळी तिथं धूर झाला, त्यावेळी तिथल्या मुलांना अधिक त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे चार मुलं जखमी झाली होती. दोरीचा आधार घेऊन काही विद्यार्थ्यांनी तिथून उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु दोरी त्यांच्या हातातून निसटल्यामुळे विद्यार्थी खाली पडले.

सुमन नलवा यांनी सांगितलं की, बिल्डींगच्या मीटरमध्ये आग लागली होती. सगळीकडं धुर पसरला होता. ज्यामुळे विद्यार्थी आणि तिथं असलेली लोकं घाबरली. तिथं सिविल सर्विसचं कोचिंग क्लाचं केंद्र आहे. काही विद्यार्थी आग लागली त्यावेळी खाली येण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामध्ये तीन-चार मुलांना खाली उतरत असताना जखम झाली आहे. त्यांना रुग्णालयात नेले असून आग नियंत्रणात आणली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.तिथल्या लोकांनी पोलिसांनी आणि अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तिथं तात्काळ मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे अशी तिथल्या परिसरात चर्चा सुरु आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम