राज्यात गुन्हेगारांना कायद्याची भीती नाही ; सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जून २०२३ ।  राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक महिलांसह मुलीवर अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात घडू लागल्या आहे. नुकतेच मुंबईतील लोकलमध्ये बुधवारी पहाटे एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर केलेली पोस्ट

”संतापजनक ! चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. या घृणास्पद घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तपास यंत्रणांनी कार्यवाही करणे गरजेचे आहे”, असे ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. तसेच राज्यसरकारवर देखील निशाणा साधला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम