कॉमेडीचा बादशाह हरपला; मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

हास्य कलाकार व अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे निधन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ सप्टेंबर २०२२ । मनोरंजनविश्वात “कॉमेडी किंग” म्हणून ओळखले जाणारे हास्य कलाकार व अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे आज वयाच्या ५८व्या वर्षी सकाळी १० वाजून २० मिनिटाला दुःखद निधन झाले असून, त्यांच्या अकाली जाण्याने अनेक स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर होते. ४१ दिवस शर्थीने उपचार करूनही डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले व अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

मात्र, इस्पितळात दाखल करण्यात आल्यापासून त्यांच्या प्रकृतीत कोणत्याच प्रकारची सुधारणा झाली नव्हती तसेच हृदयाचे ठोके मंदावल्याने डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित करून पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवले.

सत्यप्रकाश उर्फ राजू श्रीवास्तव यांच्या पश्चात पत्नी शिखा व दोन अपत्ये, मुलगी अंतरा व मुलगा आयुष्मान आहे. बालपणापासूनच हास्यकलाकार बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी अनेक कॉमेडी शोजचे सूत्रसंचालन, नाटक, सिनेमा व जाहिरातींमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केली.

दरम्यान, राजू यांना राजकीय, मनोरंजन व अनेक चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम