लग्नाच्या वाढदिवशी व्याघ्र सफारीला गेलेल्या कुटुंबावर शोककळा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ मे २०२३ ।  चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारीला आलेल्या मुंबई येथील पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास काळा आंबा परिसर कोलारा येथे घडली आहे. केशव बालगी (७१) हे पर्यटक लग्नाच्या ४० व्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी येथे आले होते.

मुंबई येथील रहिवासी असलेले केशव बालगी आपल्या परिवारासह लग्नाच्या ४० व्या वाढदिवस साजरा करण्यासाठी सोमवारी ताडोबा येथील संसारा गेस्ट हाऊस येथे आले होते. दुपारी पत्नी, मुलगा व सून यांच्यासोबत कोलारा कोअर जंगलात जात असताना अचानक केशव बालगी यांची प्रकृती खालावली. क्षणाचाही विलंब न करता त्यांना त्यांचा मुलगा, सून, गाईड व चालकांनी मासळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम