काका-पुतण्यातील संघर्ष : पवारांची ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनरबाजी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ सप्टेंबर २०२३

भाजपसोबत सत्तेत अजित पवार गेल्यानंतर रोहित पवार हे पक्षासह राज्यात मोठ्या प्रमाणात जास्त सक्रिय झाले असून त्यांनी दौरे सुरू केला आहे. तसेच विविध पदाधिकाऱ्यांचे मेळावे, भेटी आदिंच्या माध्यमातून रोहित पवार अजित पवार यांची जागा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्याला या बॅनरमुळे दुजोरा मिळाला आहे. अजित पवार यांनी काका शरद पवार यांची साथ सोडून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तर रोहित पवार देखील काका अजित पवार यांची साथ सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार याची जास्तच चर्चा रंगली आहे. त्यामुळेच राज्यात आधी अजित पवार यांच्या नावाचे बॅनर भावी मुख्यमंत्री म्हणुन लागले होते. त्यानंतर त्यात सुप्रिया सुळे यांचाही समावेश झाला. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही सुळे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला होता. या रांगेत आता आमदार रोहित पवार यांचाही समावेश झाला आहे. रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आहे.

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिनानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. याची जोरदार चर्चा आता राजकीय क्षेत्रात सुरू आहे. पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर हे बॅनर लागले आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष जात आहे. रोहित पवार यांच्या समर्थकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे फ्लेक्स लावले आहेत. रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे, असा दावा अजित दादांचे समर्थक, पदाधिकारी आणि आमदारांनी केला होता. आज भावी मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छांचे बॅनर लागल्याने त्या दाव्यावर खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगली आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम