आराखडाच तातडीने तयार करा ; सुप्रिया सुळेचे ट्विट !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ सप्टेंबर २०२३ | राज्यातील भाजप, शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत आहे तर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटातील खासदार सुप्रिया सुळे यांचे सध्या एक ट्विट मोठ्या चर्चेत आले आहे. त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणेमहापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा आराखडाच अद्याप तयार झालेला नाही. परिणामी या गावांत विकासकामे करताना नेहमी अडथळे येत आहेत, तरी तातडीने या गावांचा करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना टॅग करत खा. सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासाबाबत कोणतेही महत्वाचे निर्णय होत नाहीत. यामागे समाविष्ट गावांसाठीचा विकास आराखडा तयार झाला नसल्याचे कारण सांगण्यात येते. याचा मोठा फटका या गावांतील नागरिकांना बसत असून पायाभूत सुविधांच्या पूर्ततेबाबतही अडचणी येत आहेत. ही मोठी काळजीची गोष्ट आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून, प्रशासकीय आणि शासकीय दिरंगाईचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतो, हे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आणि पुणे महापालिका आयुक्त यांनी तातडीने पुढाकार घेऊन विकास आराखडा तयार करुन तो मंजूर करण्यासंबंधी सकारात्मक विचार करुन कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम