बाजारातील गर्दी झाली कमी ; सोन्यासह चांदीच्या दरात वाढ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ ऑक्टोबर २०२३

राज्यात सध्या सणासुदीचे दिवस सुरु असून येत्या काही दिवसात दिवाळीचा उत्सव येत असतांना व मागील दोन महिन्यात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. राज्यात सोन स्वस्त झाल्यामुळे खरेदीदारांची मंदीयाळी पाहायला मिळाली. इस्त्राइल हमास युद्धाचा काही प्रमाणात परिणाम पेट्रोल-डिझेल आणि सोन्या चांदीच्या दरावर दिसून आला. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर कोसळले होते. परंतु, मागील आठवड्यापासून सोन्याच्या दरात उसळी पाहायला मिळाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर ५००० रुपयांनी वाढले आहेत. सध्या सोन्याचा भाव ६० हजार असून दसरा-दिवाळीत आणखी महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवरात्री उत्सव सुरु झाला असून, सणासुदीत अनेक ग्रहाकांचा कल हा सोनं खरेदी करण्यावर असतो. दोन दिवसांपूर्वी सोन्याचे भाव किंचित घसरले होते. आज गुड रिटर्न्सच्या वेबासाइटनुसार २२ कॅरेटनुसार १ ग्रॅमसाठी ५,५६० रुपये तर २४ कॅरेटनुसार ६०,६४० प्रतितोळ्यासाठी मोजावे लागणार आहे. अशातच आज सोन्याचा भावात ५४०० रुपयांनी वाढ झाली आहे.

चांदीच्या दरातही उसळी पाहायला मिळाली. प्रति किलोनुसार आज चांदीसाठी ७४६०० रुपये मोजावे लागणार आहे. मागील भावानुसार चांदीच्या दरात हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम