दोन राशींना मिळणार आनंदाची बातमी तर होणार खर्च !

बातमी शेअर करा...
मेष  : धन हानी होऊ शकते. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. आपला किंमती वेळ त्यांच्या बरोबर घालवा. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते.
वृषभ : आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस.
मिथुन  : धन लाभ होण्याची शक्यता. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडविण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे.
कर्क  : गुंतवणुकीतून फायदा. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा. जोडीदार आज पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.
सिंह  : आर्थिक लाभाची शक्यता. ऐतिहासिक स्थळांवर कुटुंबाची छोटीशी पिकनिक प्लॅन करा. काही जणांसाठी विवाहाचे योग. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील.
कन्या  : मर्यादेबाहेर खर्च करू नका. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे.
तूळ : आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता. आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील.
वृश्चिक : आर्थिक खर्च होऊ शकतो. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल तर कामाची पद्धत तपासून पाहा. पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल.
धनु : आर्थिक हानी संभवते. कुटूंबियांसमवेत काही प्रेमाचे क्षण अनुभवा. व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणालातरी फायदा होईल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल.
मकर : धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता. मानसिक शांती मिळेल. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. कामाच्या पध्दतीत बदल करा.
कुंभ : आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता. आर्थिक आघाडीवर सुधारणा. कुटुंबियांसोबत संध्याकाळी मौजमजा करण्याचे बेत ठरवा. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम.
मीन : आर्थिक तोटा होण्याची शक्यता. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. जोडीदारासोबत प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम