छ.शिवाजीमहाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ३ एप्रिल २०२४ । आज दि. ३ २०२४ एप्रिल रोजी कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त
मराठा सेवा संघाच्या कार्यालयात सकाळी ठिक ९.०० वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी सुरवातीला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन मराठा सेवा संघाचे ए पी जे अब्दुल कलाम ईंन्फाॅर्मेशन टेक्नॉलॉजी कक्षाचे जिल्हा अध्यक्ष छाजेंद्र सोनवण तसेच माजी जिल्हा कार्याध्यक्ष मिलन पाटील , पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बी ए पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर कुळवाडी भुषण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन जिजाऊ ब्रिगेड जिल्हाअध्यक्षा वसुमतीताई पाटील, जिल्हा सचिव सिमाताई देसले, तालुका अध्यक्षा मनिषाताई पवार,दिवान लोटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्षा सुलभाताई कुवर विभागीय अध्यक्षा नुतनताई पाटील यांनी जिजाऊ वंदना सादर केली. जिल्हा सचिव एस एम पाटील यांनी शिवरायांचे जिवनचरित्रावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील,एस.एम.पाटील, पी.एन.पाटील,प्रा डॉ सदाशिव सूर्यवंशी,डी.एल.पाटील, मिंलन पाटील,आर.जे.पवार, बी.ए.पाटील,छाजेंद्र सोनवणे,डी.टी.पाटील, संजय पाटील, लालचंद पाटील, सुलभा कुवर,नुतन पाटील, वसुमती पाटील, मनिषा पवार,सिमा देसले आदीसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ सदाशिव सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन वधुवर कक्षाचे अध्यक्ष पी एन पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम