राज्यात कॉंग्रेस बनला सर्वात मोठा विरोधी पक्ष !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ जुलै २०२३ ।  राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड आज झालेली असतांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे आले आहे. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महायुतीचं बळ आणखी वाढलं आहे. अजित पवार यांना राज्यपाल रमेश बैस यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. त्यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. आज एकूण 9 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत या सर्व मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात येणार आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम