कॉंग्रेसचा ठरलं ‘या’ नेत्याला मिळणार विरोधी पक्षनेते पद !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ ऑगस्ट २०२३ | राज्यातील राष्ट्रवादीत उभी फुट पाडत अजित पवार भाजप व शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्याच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता नव्हता तब्बल चार वर्षांनंतर काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद चालून आले आहे. या पदासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे न जाणाऱ्या नेत्याच्या शोधात पक्षश्रेष्ठी होते. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे तीन नेत्यांची नावे चर्चेत असताना विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता पद काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांना मिळाल्याची माहीती समोर आली आहे.

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता पद काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांना देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे. बाळासाहेब थोरात यांना हा निर्णय दिल्ली हायकंमाडने कळवला आहे. त्याचबरोबर आता महाराष्ट्राच्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदी विजय वड्डेटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नवा विरोधी पक्षनेता कोण असेल असा प्रश्न निर्माण झाला होता. जास्त संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला होता. त्यानुसार आज विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहेत.
काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील नेत्याकडे ही जबाबदारी मिळण्याची शक्यता याआधी वर्तवण्यात आली होती. विरोधी विरोधी पक्षनेते पदासाठी चार नावांची जोरदार चर्चा होती. यामध्ये सुनील केदार, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावाची काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा होती. त्यानुसार आज विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर बाळासाहेब थोरात काँग्रेस गटनेते राहणार आहेत त्यामध्ये कोणताही बदल नाही, अशी माहीती आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम