कॉंग्रेस नेते वडेट्टीवार यांनी सरकारला विचारला जाब !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ ऑगस्ट २०२३ | राज्यात गेल्या काही दिवसापासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे हे बेताल वक्तव्य करीत असल्याने अनेक ठिकाणी त्यांचा निषेध नोंदविला जात असून यावर आता कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला जाब विचारला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, “जे शब्द आम्ही उच्चारू शकत नाहीत. अशा गलिच्छ शब्दांत या नालायक माणसानं वक्तव्य केलं आहे. म्हणून त्याला असेल तिथून उचलून कोठडीत घालावं, ही सरकारकडून अपेक्षा आहे. बहुजनांचा अपमान, राष्ट्रध्वजाचा अपमान, राष्ट्रपित्याचा अपमान आणि त्याच्याही पलिकडे जाऊन जिथं स्वतः या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले त्या साईबाबांचा अपमान, करोडो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या करोडो लोकांचा अपमान या पापभिरु नालायक माणसानं केलेला आहे. यावरुनच या माणसाची लायकी आणि जागा कोडडीत आहे. या माणसावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे” असंही त्यांनी म्हटलं आहे. या देशातील जनता हे कदापि सहन करणार नाही. स्वतः उपमुख्यंत्र्यांनी राष्ट्रपित्या अपमान सहन करु शकत नाही अशी भूमिका मांडली होती. त्यामुळं आता भिडेंना कधी तुरुंगात टाकणार हा प्रश्न आहे. अन्यथा आम्हाला याचा बंदोबस्त करावा लागेल, यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असा इशाराही वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम