प्रसिद्ध अभिनेता पुनीत सिंगवर बलात्काराचा गुन्हा दाखल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ ऑगस्ट २०२३ | देशातील हिंदी टीव्ही मनोरंजन विश्वातून एक खळबळजनक बातमी समोर आली असून टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता पुनीत सिंगवर बलात्काराचा आरोप करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वनराई पोलिस ठाण्यात एका अभिनेत्रीने अभिनेत्यावर बलात्काराचे आरोप केले होते. आता त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पुनीतनं आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी अभिनेता पुनितसिंग राजपूत विरोधात ३७६ (२)(द), ३७७ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वनराई पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम