काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष : मतमोजणी सुरु

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ ऑक्टोबर २०२२ । काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज १९ रोजी जाहीर होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य सोमवारी दि १७ रोजी मतपेट्यांमध्ये बंद झाले होते. या निवडणुकीमुळे काँग्रेसला दोन दशकांहून अधिक काळानंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे.

सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून मल्लिकार्जून खरगे यांच्या घरी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर या दोघांमध्ये अध्यक्षपदाचा सामना झाला आहे. 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती अध्यक्षपदी विराजमान होणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम