पीएम मोदींच्या हत्येचा कट; देशभरात खळबळ

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ सप्टेंबर २०२२ । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या वादग्रस्त संघटनेकडून पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने, या वृत्तामुळे देशात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वीच देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर झालेल्या कारवाईत शंभराहून जास्त संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडील बरेचसे साहित्यदेखील जप्त करण्यात आले. दरम्यान, ईडीकडून पंतप्रधान मोदी यांच्या जुलै २०२२ रोजी पाटण्यातील झालेल्या रॅलीला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

याचबरोबर या संघटनेच्या सदस्यांनी उत्तप्रदेशातील काही संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करण्याची योजनाही आखली होती. तसेच, पंतप्रधानांच्या पाटणा दौर्‍यादरम्यान हल्ला करण्यासाठी पीएफआयकडून १२ जुलै २०२२ रोजी ट्रेनिंग कॅम्पची स्थापना करण्यात आल्याची माहितीही ईडीने केरळमधून अटक केलेल्या पीएफआय सदस्य शफिक पायेथच्या विरोधातील रिमांड नोटमध्ये दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम