झीरो कॅलरी शुगर सेवन केल्यास होवू शकतो धोका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ मार्च २०२३ । आपण नेहमीच आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी साखरे ऐवजी आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर करतात. झीरो कॅलरी शुगर साखरेपेक्षा कमी नुकसानकारक असते, असं म्हटलं जातं. पण नवीन संशोधनात झीरो कॅलरी शुगरबाबत मोठी धक्कादायक बाब उघड झाली आहे. या संशोधनानुसार, झीरो कॅलरी शुगर आरोग्यासाठी घातक असल्याचं समोर आलं आहे. एका संशोधनात असे समोर आले आहे की, झीरो कॅलरी शुगरचं सेवन म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. झीरो कॅलरी शुगर सेवन करणाऱ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी आहे.

आरोग्यासाठी घातक असल्याचं एका नव्या संशोधनात समोर आलं आहे. एरिथ्रिटॉल नावाच्या झीरो कॅलरी साखरेमुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो, असा या संशोधनात उघड झालं आहे. क्लीव्हलँड क्लिनिकच्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. या संशोधनात असं म्हटलं आहे की, रक्तातील एरिथ्रिटॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या संशोधनात आढळून आलं आहे की, झीरो कॅलरी शुगरचे सेवन केल्याने शरीरात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. यामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि मृत्यूचा धोका वाढतो. ही फार चिंतेची बाब आहे, कारण झीरो कॅलरी शुगरच्या सेवनामुळे मृत्यूचा धोका अनेक पटींनी वाढतो. क्लीव्हलँड क्लिनिक लर्नर रिसर्च इन्स्टिट्यूटने ब्रिटन (UK) आणि युरोपमधील सुमारे 4 हजार लोकांवर संशोधन केलं. या संशोधनात या लोकांच्या शरीरावरील स्वीटनरचा प्रभावाचं निरीक्षण करण्यात आलं. या संशोधनात असं आढळून आलं की, एरिथ्रिटॉल झीरो शुगरचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. रक्तातील एरिथ्रिटॉल झीरो शुगरची पातळी वाढत जाते, त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो, रक्त गोठल्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही वाढतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम